Landscaping बरोबरच २ खोल्यांचे घरही बांधायचे ठरले. वीकएंड मध्येच मिळणारा वेळ, बजेट,उपलब्ध साधन सामुग्री आणि कुशल/अकुशल मनुष्यबळ ह्याच्या चौकटीत बसवता येईल अशा पर्यायांची पुन्हा एकदा चाचपणी झाली.
आधी स्वतःसाठी एका खोलीत स्वयंपाक घर आणि दुसऱ्या खोलीत राहण्याची सोय अशा विचारांवरून ते पुढे जर कधी काळी आपण Homestay चा पर्याय निवडलाच तर मग बरे पडेल म्हणून मग वेगवेगळ्या दोन खोल्या आणि प्रत्येक खोलीत एक छोटे kitchen platform ज्या मध्ये एक kitchen-sink बसेल, एक छोटा 'travelling gas stove' राहील, अशा विचारां पर्यंत आमची गाडी पोहोचली.
आणि प्रत्यक्षात आम्ही पप्पांच्या मार्गदर्शनाखाली आणि supervision खाली २ रूम्स (with attached bathroom in each, kitchen platform वगळून) काढल्या. दर वेळी आम्हाला कळून येत होते कि, जेंव्हा प्रत्यक्ष site वर न राहता, वीकेंड्सलाच फक्त कामावर देखरेख ठेवता येत असेल, तेंव्हा कित्येक गोष्टी आपण ठरवतो त्या प्रमाणे जशाच्या तशा घडत नाहीत.
तर असो; मना जोगते घडत नसल्या मुळे होणारी चिडचिड, आठवडा भर ऑफिसचे आणि घरातले routine काम ,वीकेंडची दगदग, प्रत्येक छोट्यातल्या छोटया गोष्टींवर (floor टाईल्स, बाथरूम ची लांबी-रुंदी , बाथरूम फ्लोररिंग अँड टाईल्स, पडवीतल्या लाद्या,)ह्यावर होणारी चर्चा,मग त्याला कधी कधी मिळालेले वादाचे स्वरूप ; त्यातून final झालेल्या गोष्टींची खरेदी, ह्या सगळ्यातून आमचे छोटे माळरानावरचे घर साकारत होते.
घर बांधून झाल्यावर आम्हाला कळले कि आम्ही त्यात काही मोठ्या चुकाही केल्या आहेत, पण त्यातूनच आम्ही मार्ग काढत गेलो . फ्लोअरिंग आणि टाईल्स साठी केलेल्या खोपोली-खानाव वाऱ्या, मातीच्या कौलांसाठी केलेला धरमतर चा प्रवास, खोलीतील छोट्या कपाटांसाठी आणि बेड साठी केलेली ओशिवरा मार्केट ची सफारी या आणि अशा खूप गोष्टी शिकायला आणि अनुभवायला मिळाल्या. काही चुकून झालेल्या गोष्टींचाही आम्हाला पुढे फायदा झाला (किंबहुना तो तसा कसा करून घ्यावा ते शिकणे भाग पडले.)
क्रमशः

No comments:
Post a Comment