त्याने राजीनामा देण्याचा मनसुबा वरिष्ठांना कळविला तरी, एवढ्या वर्षांच्या अनुभवामुळे आणि ऑफिस मधील वास्तव्यामुळे, त्याला १ वर्षासाठी 'part time' जॉब चा पर्याय कंपनी तर्फे सुचविला गेला. १ वर्षा नंतर त्याला राजीनामा देण्याचा किंवा ऑफिस मध्ये full -time रुजू होण्याचा मार्ग स्वीकारायचा होता. ह्यात दोन पर्याय होते, एकतर आठवडाभर 'part time' करायचे किंवा Monday -Thursday full-time करायचे आणि Friday ला सुट्टी. म्हणजे आता आठवड्याचे ३ दिवस आजोळसाठी देता येणे शक्य होणार होते !
ह्या दुसऱ्या पर्यायाचे आम्ही आजन्म ऋणी राहू ! कारण आजोळ चे 'Aajol-The Village Homestay' मध्ये, eco-tourism मध्ये रूपांतर होण्यात ह्या पर्यायाचा फार मोलाचा वाटा आहे. नाहीतर financially सगळे थोडे अवघड होऊन बसले असते.
पण म्हणतात ना 'अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है !'
तर हे वर्ष म्हणजे eco-tourism साठी पायाभरणीचे वर्ष ठरले. पाहुण्यांसाठी राहण्याची सोय, लहान-थोर सगळ्यांना आवडतो असा झोपाळा आणि see-saw ची सोय, जेवणाचा मेनू ठरविणे इत्यादी गोष्टींकडे आता संपूर्ण लक्ष केंद्रित केले.
'Aajol-The Village Homestay' ला महाराष्ट्र tourism मंडळातर्फे (MTDC तर्फे )Bed and Breakfast साठी मंजुरीही मिळावली .
ह्याच वर्षी चहाचा कप कसा असावा तिथपासून बाहेर 'buffet' लावायचा असल्यास कुठल्या प्रकारची भांडी लागतील ह्या सगळ्या शोध मोहिमेला सुरुवात झाली. जिथे घरातील इन मिन ३ माणसांचा स्वयंपाकही 'मावशींना' मदतीला घेऊन केला जाई तिथे एका वेळी १५ -२० जणांचा स्वयंपाक करण्यास आम्ही सज्ज झालो. आणि पुढे पुढे तर 'sky gazing' च्या event मध्ये चक्क ३०-४० जणांच्या स्वयंपाकाची जबाबदारीही मस्त पैकी पार पाडली. गावामध्ये जिथे घरातील स्त्रिया प्रामुख्याने चुलीशीच जुंपलेल्या असतात किंवा एकत्र कुटुंबामध्ये राहणार्यांना अर्थातच 'छछ्या, ह्यात काय मोठ्ठ! ' असे वाटणे साहजिक आहे. पण Engineering चा अभ्यास, त्या नंतर करिअर, नोकरी आणि मग nuclear फॅमिली ह्यातच वयाची ४० शी गाठलेल्यांना अचानक ३०-४० जणांचा स्वयंपाक म्हणजे डोक्यावरून पाणीच! त्यात आणि आपल्याला आपल्या घरच्यांच्या चवी आणि सवयी तोंडपाठ असतात, पण इथे नित्य नवीन पाहुणे आणि त्यांना रुचेल असे जेवण बनवायचे !
तर कधी अंदाज चुकत, तर कधी दारात आल्या आल्याच, "आमच्या बाळासाठी bournvita घालून दूध आणा, माझ्या बहिणीसाठी फक्त गरम दूध, आमच्या ताई साठी नुसते वरण-भात आधी आणा, मोठ्यांसाठी व्हेज जेवण लावायला घ्या आणि नॉन -व्हेज जेवण मात्र थोडे नंतरच लावा " अशा एका वेळी १० सूचना देणाऱ्या आणि आजोळ ला 'hotel' समजणाऱ्या पाहुण्यांना शांतपणे हाताळायला आम्ही शिकत होतो.
पाहुण्यांच्या सरबराई बरोबरच निसर्गाशी निगडित आणि निसर्गाच्या सानिध्यात आयोजित करता येतील असे 'workshops' घ्यायचे आम्ही ठरवले.
'Aajol-The Village Homestay' मधल्या पहिल्या workshop चा मान जातो तुषार केळकर ने conduct केलेल्या 'The Art of Nature' ह्या workshop ला. ह्या दुसऱ्या पर्यायाचे आम्ही आजन्म ऋणी राहू ! कारण आजोळ चे 'Aajol-The Village Homestay' मध्ये, eco-tourism मध्ये रूपांतर होण्यात ह्या पर्यायाचा फार मोलाचा वाटा आहे. नाहीतर financially सगळे थोडे अवघड होऊन बसले असते.
पण म्हणतात ना 'अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है !'
तर हे वर्ष म्हणजे eco-tourism साठी पायाभरणीचे वर्ष ठरले. पाहुण्यांसाठी राहण्याची सोय, लहान-थोर सगळ्यांना आवडतो असा झोपाळा आणि see-saw ची सोय, जेवणाचा मेनू ठरविणे इत्यादी गोष्टींकडे आता संपूर्ण लक्ष केंद्रित केले.
'Aajol-The Village Homestay' ला महाराष्ट्र tourism मंडळातर्फे (MTDC तर्फे )Bed and Breakfast साठी मंजुरीही मिळावली .
ह्याच वर्षी चहाचा कप कसा असावा तिथपासून बाहेर 'buffet' लावायचा असल्यास कुठल्या प्रकारची भांडी लागतील ह्या सगळ्या शोध मोहिमेला सुरुवात झाली. जिथे घरातील इन मिन ३ माणसांचा स्वयंपाकही 'मावशींना' मदतीला घेऊन केला जाई तिथे एका वेळी १५ -२० जणांचा स्वयंपाक करण्यास आम्ही सज्ज झालो. आणि पुढे पुढे तर 'sky gazing' च्या event मध्ये चक्क ३०-४० जणांच्या स्वयंपाकाची जबाबदारीही मस्त पैकी पार पाडली. गावामध्ये जिथे घरातील स्त्रिया प्रामुख्याने चुलीशीच जुंपलेल्या असतात किंवा एकत्र कुटुंबामध्ये राहणार्यांना अर्थातच 'छछ्या, ह्यात काय मोठ्ठ! ' असे वाटणे साहजिक आहे. पण Engineering चा अभ्यास, त्या नंतर करिअर, नोकरी आणि मग nuclear फॅमिली ह्यातच वयाची ४० शी गाठलेल्यांना अचानक ३०-४० जणांचा स्वयंपाक म्हणजे डोक्यावरून पाणीच! त्यात आणि आपल्याला आपल्या घरच्यांच्या चवी आणि सवयी तोंडपाठ असतात, पण इथे नित्य नवीन पाहुणे आणि त्यांना रुचेल असे जेवण बनवायचे !
तर कधी अंदाज चुकत, तर कधी दारात आल्या आल्याच, "आमच्या बाळासाठी bournvita घालून दूध आणा, माझ्या बहिणीसाठी फक्त गरम दूध, आमच्या ताई साठी नुसते वरण-भात आधी आणा, मोठ्यांसाठी व्हेज जेवण लावायला घ्या आणि नॉन -व्हेज जेवण मात्र थोडे नंतरच लावा " अशा एका वेळी १० सूचना देणाऱ्या आणि आजोळ ला 'hotel' समजणाऱ्या पाहुण्यांना शांतपणे हाताळायला आम्ही शिकत होतो.
पाहुण्यांच्या सरबराई बरोबरच निसर्गाशी निगडित आणि निसर्गाच्या सानिध्यात आयोजित करता येतील असे 'workshops' घ्यायचे आम्ही ठरवले.
ह्या workshop च्या यशा मुळे आता आम्हाला नवीन हुरूप येत होता आणि आपण जे करतोय ते योग्य आहे अशी खात्री वाटू लागली होती .
क्रमशः