नोकरीच्या सुरुवातीच्या काळात किंवा फारशी जबाबदारी नसलेल्या bachelor life मध्ये नोकरीला राजीनामा देऊन स्वतःचे business चालू करणे तुलनेने सोप्पे असते. हां, आता त्यावेळीही चाकोरी बाहेरचा विचार करणे तेवढेच अवघड असते जेवढे ते आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर असते. परंतु एकाच क्षेत्रात खूप जास्त experience असणाऱ्यांना त्या क्षेत्रात 'job' चे पर्याय मर्यादित होत जातात.नोकरी नामक पिरॅमिड च्या टोकावर पदांची संख्या कमी आणि पर्यायी माणसे जास्त असेच काहीसे चित्र असते त्यामुळे जस जसे वय वाढते तस तसे 'लाथ मारेन तिथे नोकरी ' म्हणण्याचे प्रमाण कमी होत जाते.
तर सांगायचं मुद्दा असा की ज्या वेळी मी पूर्ण वेळेची नोकरी सोडून कधी पार्ट टाईम, कधी 'work from home' किंवा कधी पूर्ण वेळ 'home maker असे वेगवेगळॆ पर्याय त्या त्या वेळी गरज म्हणून करीत होते. त्या वेळी त्यानेही पूर्ण वेळेची नोकरी 'आजोळच्या' भरवशावर सोडून देणे म्हणजे अंधारात सर्कशीतल्या उंच झुल्यावरून स्वतःला सोडून देण्यासारखे होते. कर्त्या पुरुषाने सुस्थितीतला जॉब सोडायचा !!
ज्या नोकरी मध्ये त्याने आयुष्याची तब्बल ११ वर्षे घालवली (IT क्षेत्राच्या 'ह्या ऑफिस मधून त्या ऑफिस मध्ये' उड्या मारण्याच्या वहिवाटे नुसार एकाच ऑफिस मध्ये एवढी वर्षे खूप जास्त आहेत.) त्या ऑफिसला आणि एकंदरीत नोकरीला राम राम करणे तेवढे सोप्पे नाही. पण पैसा, नोकरी मधली सुरक्षितता आणि शाश्वतता ह्याचा जितका जास्त विचार आम्ही करीत राहिलो असतो तितका हा निर्णय घेणे कठीण होऊन बसले असते.
आम्ही ही 'leap of faith घायचे ठरवले. आणि हो नाही करीत तो दिवस आला. त्याने ऑफिस मध्ये त्याच्या 'डिलिव्हरी हेड' ला 'आजोळ' व पूर्ण वेळेची नोकरी ह्या दोन दगडांवर पाय ठेवून जाणे जमत नसल्यामुळे आपण राजीनामा द्यायच्या विचारात आहोत हे कळविले.
क्रमशः
क्रमशः
No comments:
Post a Comment