Eco-tourism चालू करायला अजून अवकाश होता.
हिरवाई ने नटायला माळरानाने आत्ता कुठे सुरुवात केली होती. पाहुण्यांचे स्वागत करायला अजून तो तयार न्हवता. त्या मुळे आम्ही आमचा मोर्चा, 'गावी स्थलांतरित झालेले किंवा तिथे राहणारे अवलिया' ह्या विषयावरील संशोधनाकडे वळविला .
"Life is what you make it, FIND YOUR OWN " किंवा
"Change your thoughts and you change your world " ह्या आणि अशांसारखे आपण आतापर्यंत फक्त पुस्तक, सिनेमां मधून अनुभवलेले, रोमांचकारी, अद्भुत आणि परिश्रमाने भरलेले आयुष्य ज्यांनी वास्तवात आणले अशा अवलियांची दुनिया आम्ही याची डोळा पाहून यायचे ठरवले.
पोपटराव पवार
एका जुन्या मराठी सिरीयल मधून (मला वाटते soKool हि सोनाली कुलकर्णीची सिरीयल होती) ज्यांच्या बद्दल ऐकले होते ते नगर जिल्ह्यातील 'हिवरे बाजार' चे ख्यातकीर्त सरपंच पोपटराव पवार. ज्यांनी पाणी आणि मातीचे संवर्धन करून आणि गावच्या एकत्री करणातून दुष्काळी 'हिवरे बाजार' चा सुंदर कायापालट केलेला आहे.
आमच्या शहरी मनाला अतिशय आशचर्य जनक अशी कुठली बाब वाटली असेल तर त्या गावात आम्ही गेलो तेंव्हा एकही दुकान (रेशनिंग दुकान वगळता) किंवा हॉटेल किंवा पान टपरी न्हवती.कारण हेच कि मुलांना/तरुणांना वेफर्स, स्नॅक्स, पान, बिडी अशा कुठल्याही गोष्टींची सवय लागू नये. गावातले रस्तेही आपण त्यावर आरामात झोपू शकू इतके स्वच्छ होते. काही वर्षांपूर्वी हेच गाव गरिबीत आणि व्यसनाधीनतेमध्ये आकंठ बुडाले होते हे आता कोणी सांगितले तर विश्वासच बसू शकत नाही.

source: Internet
'वॉटर बँक' आणि 'सर्व सहमतातून त्या त्या वर्षी काढण्यात येणारे पीक' ह्या दोन गोष्टींचा वापर, अतिशय कमी पाण्यात येणारेच पीक घ्यायचे समस्त गावकऱ्यांना केलेले compulsion वजा आवाहन; उगीच ते गाव संपूर्ण महाराष्ट्रात 'Model Village' म्हणून प्रसिद्ध नाही! आम्ही गेलो तेंव्हाही तिथे buses भरून दूरदूरच्या गावातील रहिवासी /ग्रामपंचायत अधिकारी भेट द्यायला आले होते. जरी आम्ही दोघेच तिथे गेलो होतो तरीही तेथील एका तज्ज्ञ व्यक्तीने आम्हाला पार डोंगरावर नेवून watershed मधला 'ridge to valley approach' समजावून सांगितला. खोटे का बोला, पण त्यांनी त्यावेळी सांगितलेले 'contour trenches, gully plugging,loose boulder structure, gabian structure अशांसारखे शब्द आम्हाला alien वाटत होते ! पण त्या नंतर लगेच २ वर्षात मी स्वत: watershed management शिकणार आहे हे स्वप्नातही न्हवते. आणि आता त्या सगळ्याचा अर्थ व्यवस्थित समजतोय. ('Connecting dots ' म्हणतात ते हे असे ! )
source: Internet
source: Internet
१९७७ साली शहरातून दापोली तालुक्यातील 'गव्हे' ह्या गावी स्थायिक झालेले 'निसर्ग सहवासाचे' अमृते कुटुंब हे ह्या अवलियां पैकीच; मी, आई कडून त्यांच्या बद्दल खूप ऐकले होते की त्यांनी खिशात मोजकेच पैसे असताना शहरातून 'गव्हे' गावी स्थलांतर केले. पुढे टप्या टप्याने पूर्ण डोंगराचा त्यांनी कायापालट केला वगैरे. गावी राहण्याचा आणि शेतीचा काहीच अनुभव त्यांच्याही गाठीशी न्हवता आणि त्यामुळेच त्यांचे काम प्रत्यक्ष पाहणे आमच्या साठी गरजेचे आणि स्फुर्तीदायक होते. त्यांचे 'निसर्ग सहवास' eco -tourism चे एक उत्कृष्ट
रोल मॉडेल आहे. त्यांचा मुलगा आशिष अमृते हा त्या eco -tourism चा शिल्पकार ! खरेच, एक पिढी शहरातून गावी स्थालांतर करण्याचा धाडशी निर्णय घेते काय आणि त्यांची पुढली पिढी त्या धाडसाला एव्हढ्या सुंदर वळणावर आणून सोडते काय, सगळेच रोमॅंटिक!
वेंकट
असाच एक अवलिया म्हणजे 'वेंकट सर', एका google ग्रुप मुळे त्यांच्या बद्दल आम्हाला कळले.
तेही corporate lifestyle ला कंटाळून, शहरी जीवनाला कायमचा राम राम ठोकून पूर्ण वेळ निसर्गाचे, शेतीचे वेंकट
असाच एक अवलिया म्हणजे 'वेंकट सर', एका google ग्रुप मुळे त्यांच्या बद्दल आम्हाला कळले.
scientific संशोधन करण्याकडे वळले होते. आजही ते पालघर तालुक्यात त्यांच्या शेतावर राहतात. भात, वाल, हळद, मटकी, ऑइल सीड्स, वेगवेगळ्या भाज्या त्यांच्या फार्म वरतीच पिकवून 'Self-sufficient living' ची त्यांची वाटचाल सुरु आहे.
केतन शाह
कर्जतचे केतन शाह, हे ही एक मुंबईत राहून, कर्जतला ये जा करणारे व भाजीचा मळा फुलविणारे आधुनिक शेतकरी. शिक्षणाने ते CA असले तरी आता ते पूर्णवेळ ऑरगॅनिक प्रॉडक्ट्स च्या retailing चा व्यवसाय करतात. त्यांनी केळी, अननस, पपई , शेवगा, दुधी भोपळा, कांदे आणि इतर भाज्या पिकवण्यात किती मेहनत घेतली आहे ते त्यांचा रहदारीच्या दृष्टीने अवघड आणि काहीसे कर्जत शहरापासून बरेच आड वळणावर असलेले शेत पाहूनच येते.
स्वर्गीय भास्कर सावे (मृत्यू : २०१५)
गुजरात -महाराष्ट्र बॉर्डर वरील, उमरगाव मध्ये राहणारे , 'Gandhi of natural farming' म्हणून ओळखले जाणारे ऋषितुल्य भास्करजी सावे. YouTube वरील natural फार्मिंग वरील videos बघताना कळेल कि 'one straw revolution' घडवून आणणारा Masanobu Fukuoka नावाचा japanese अवलिया १९७७ साली भास्कर सावेंच्या फार्मला भेट देऊन गेला. 'कल्पवृक्ष' हे त्यांच्या 'food forest' चे नाव. संपूर्ण देशभरातून agricultural scientists, शेतकरी, विद्यार्थी त्यांच्या कडील ज्ञानामृताचे प्राशन करण्यासाठी आणि त्यांच्या नारळ व चिकूनी डवरलेल्या वाडीला भेट द्यायला येतात . ५० वर्षांचे, १० एकरावरील त्यांचे हे शेत, २ एकरांवरील नारळाची 'नर्सरी' आणि ३ एकरांवरील भात शेती त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी परिपूर्ण आहे. कुठल्याही बाह्य 'inputs' ची गरज त्यांना लागत नाही. आमच्या 'फॅमिली' friendच्या ओळखी मुळे अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला जवळून भेटण्याचा योग जुळून आला. 'वापसा', 'mulching', 'निसर्गाचे सहजीवन' आणि विषमुक्त नैसर्गिक शेती ह्यांचे महत्व त्यांच्या मुलाने आम्हाला समजावून सांगितले. भास्करजी सावे आता वयोमानामुळे थोडे थकले होते, ते आता फारसे कोणाशी बोलत नसत . (पुढच्याच वर्षी त्यांच्या निधनाची बातमी ऐकली आणि आम्ही किती नशीबवान आहोत कि आम्हाला त्यानां प्रत्यक्ष भेटता आले, असा विचार मनात डोकावून गेला.)




क्रमशः
No comments:
Post a Comment