संपूर्ण मे ते सप्टेंबर गोष्टी फार वेगाने घडत होत्या.
हो-नाही करत करत, इंद्रायणी जातीचा (local variety) तांदूळ, खालच्या भात-खाचरांमध्ये घायचे ठरले. घरातल्या सगळ्यांनी गुढघ्याभर चिखलात माखून भात-लावणी अनुभवली. त्याने नांगराणीचाही अनुभव घेतला. पुढे ह्या तांदळाचा भातासाठी नाही पण भाकरी साठी खूप छान उपयोग झाला. आम्हालाही घरच्या तांदुळाची भाकरी कशी असते ते चाखायला मिळाले. मात्र तो पहिला आणि शेवटचा अनुभव होता.
गडी माणसांची उपलब्धता, बैलजोडी आणि नांगरणीचा खर्च आणि त्या बदल्यात असणारे एवढुसे भात-खाचर ह्याचा ताळमेळ न बसल्यामुळे पुढील वर्षांपासून आम्ही भात पिकविण्याचा नाद सोडून दिला. जेव्हा स्वतः पुरता भात काढायचा असतो तेंव्हा, स्वतःची बैल जोडी, रोजंदारी वरच्या गडयां ऐवजी स्वतःचे अख्खे कुटुंब राबणारे असेल तर आणि तरच ते फायदेशीर असते नाहीतर बाहेरून तांदुळ विकत घेणेच परवडते.
पण सगळ्याच गोष्टी पैश्यात मोजाता येत नाहीत, अनुभवाला मोल नसते.
शहरात हयात घालवून अन्न निर्मितीचा आनंद कसे बरे घेता आला असता.
You feel more connected to your food when you have spent some time growing it.
भविष्यात पुन्हा भात शेती करण्याचा मनसुबा अजूनही आहे.
भात शेती बरोबरच, वांगे, मिरच्या, भेंडी, काकडी,चवळी, दुधी ह्यांचीही थोड्या प्रमाणात लागवड करून बघितली. मे महिन्यातच, आम्ही माती, परीक्षणासाठी अलिबागला पाठवून दिली होती, उद्देश हाच की त्यामध्ये कुठले पीक घेता येईल,पण आजतागायत आम्हाला काही त्याचे अनुमान मिळालेले नाही.
उलट गेल्या ५ वर्षातील चुकांमधून आणि अनुभवातून आम्हाला आता कळलंय की इथे काय चांगले पिकते आणि काय नाही.
अजून एका सुंदर कामात आम्ही बुडून गेलो होतो.
इंटरनेटच्या माध्यमातून विविध प्रकारचे pathways, pergolas, arches आणि रॉक गार्डन्स बद्दल माहिती मिळवायची आणि आपल्याला काय करता येईल त्याचे नियोजन करायचे.

एक weekend तर असा होता की आमच्या दोघांमध्ये nursery त जावून झाडे निवडून ती tempo द्वारे आणण्याचे त्राणच शिल्लक नव्हते. तरीही काही practical बाबींमुळे एक न्हवे तर पार तळेगाव, रावेत ह्या ठिकाणच्या 3-4 nurseries मधून झाडे आणावी लागली.
एका रविवारी 50 बोगनवेल स्वतःच सगळे खड्डे करून लावाव्या लागल्या.

आजही तो अनुपम सौंदर्याने नटलेला pathway आणि कुंपणावर विराजमान रंगीबेरंगी बोगनवेली बघितल्या की केलेल्या श्रमाचे चिज झाल्यासारखे वाटते.








No comments:
Post a Comment