Saturday, 18 November 2017

भाग १५- अवलिया : तुषार केळकर

'यूं ही चला चल राही, कितनी हसीन है ये दुनिया
 भूल सारे झमेले, देख फूलों के मेले बड़ी रंगीन है ये दुनिया
ये रास्ता है कह रहा अब मुझसे, मिलने को है कोई कहीं अब तुझसे..'
'Atmatrupti' (आत्मतृप्ती') च्या वाटेवर प्रवास करणाऱ्या 'उद्धर'च्या Tushar Kelkar ला असेच काहीसे वाटत असेल का, जेव्हा त्याने त्याचा हा प्रवास सुरु केला ?!

तुषार केळकर,  रायगड जिल्ह्यातील 'उध्दर' गावी लहानाचा मोठा झालेला,  mechanical डिप्लोमा केलेला तुमच्या आमच्या सारखाच एक तरुण; आजुबाजुची तरुणाई शहराकडे नोकरीसाठी वळत असताना, 
हा मात्र  नोकरीची कांस न धरता, 'सेंद्रिय (organic ) शेती आणि निसर्गाला पूरक असे मातीचे, बांबूचे बांधकाम थोडक्यात Eco -Architect म्ह्णून गावातच आपले बस्तान बसवू पाहतोय. आपल्या जीवनातूनच तो गावातील तरुणांपुढे एक आदर्श उभारू पाहतोय की 'शहरातील हॉटेल मधली चाकरी करण्यापेक्षा, दहा बाय दहा च्या भाड्याच्या खोलीत राहण्यापेक्षा, गावात स्वतःच्या घरी राहून, आजवर दुर्लक्षिलेल्या शेतीला नवजीवन देऊन गावामध्येच उपजीविकेचे साधन निर्माण करता येईल का. '     
आपल्या सारख्याच परिस्थितींतून गेलेली ही माणसे त्यांचे आयुष्य अशा काही मनस्वीपणे जगत असतात कि आपल्याला त्यांच्याबद्दल आदर वाटत असतानाच कुतुहुलही वाटून जाते की 'असे मनस्वी आयुष्य जगण्याचा आपण विचार जरी केला तरी जी असुरक्षिततेची भावना आपल्या मनात जागी होती, त्या भीतीवर ही माणसे कशी मात करतात ? आर्थिक सुबत्ता, त्या सोबतच येणारे स्थैर्य, ऐषोआराम ह्या सर्वांचे विचार आपल्याला ज्या मोहात अडकवतात आणि एकसुरी आयुष्य जगण्यास भाग पडतात, ते मोह ह्या मनस्वी लोकांना पडतच नाहीत का? की त्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच वेगळी असते ?'



शालेय वयातच त्याच्याच एका चुलतभावामुळे मिळालेलं सर्प ज्ञान, त्यातून निर्माण झालेली निसर्गाबद्दलची आस्था तुषारला जंगल प्रेमी आणि एकंदरीत निसर्ग प्रेमी बनवत गेली. सर्प मित्र असलेल्या तुषारला कधी-कधी एकटेच जंगलात जाऊन राहायला आवडते.  लोहगड आणि परिसरातील सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये तो एकटाच रात्र रात्र राहूनही आलाय. राजस्थान, हिमांचल येथे जाऊन कॅम्पिंग करायला त्याला आवडते. 




तुषारच्या बाबतीत योगायोगानेच गोष्टी घडत गेल्या. तो मुंबईत icici बँकेत interview द्यायला आला होता आणि सिलेक्टही झाला होता.  बँकेत रुजू व्हायला ३ दिवस होते, त्या ३ दिवसात 'आनंद पेंढारकर' ह्या मित्राकडून पालघर मधील एका organic farm getaway वर  group coordination, group games organize करणारे कोणीतरी हवे होते असे कळले. निसर्गाच्या सहवासात राहून काम करण्याची संधी स्वतःहून चालून आली म्हटल्यावर तुषारने मग सरळ  icici बँकेत जाण्या ऐवजी पालघरचा रस्ता धरला. तेथील एका वर्षात तो बऱ्याच गोष्टी शिकला आणि इथेच तो 'Swaraj University' च्या रेवा दांडगे आणि मनीष जैन ह्यांना भेटला. रेवा दांडगे ह्यांचं कडून 'तपोवन आश्रम' उदयपूर येथील Swaraj University च्या 'खोजी' बद्दल त्याला माहिती मिळाली.  (Swaraj University is based on the philosophy of self-designed learning and green entrepreneurship  - src: इंटरनेट ). पालघर मध्ये एक वर्ष काढल्यावर मग त्याने Swaraj University मध्ये २ वर्षे राहून earth building, bamboo construction ह्या त्याच्या जिव्हाळ्याच्या विषयावर 'खोजीगिरी' केली.  उदयपूर कॅम्पस मध्येच पहिले 'bamboo hut' बनवून आपल्या creativity ला वाट मोकळी करून दिली. 



स्वराज मधून बाहेर पडल्यानंतर तुषार सध्या त्याच्या मूळगावी उद्धरला त्याच्या शेतावर 'Atmatrupti' नावाचे 'Open Community space' विकसित करण्यात गढून गेलाय.  शहरी लोकांना AC शिवाय, कोणत्याही luxury शिवाय निसर्गाच्या सान्निध्यात मोकळ्या आभाळाखाली 'कारवी' आणि बांबूच्या झोपडीत राहण्याचा आणि शेतावर काम करण्याचा विलक्षण अनुभव देण्याचे काम तो इथे करतोय.  त्याच्या ह्या Atmatrupti मध्ये 'helpx' 'workaway' सारख्या वेबसाईट च्या माध्यमातून बरीच युरोपियन, अमेरिकन मंडळी राहून आणि त्याच्या बरोबरीने कामे करून गेली आहेत. त्याला जगाची माहिती मिळवायला जगभर फिरावे लागत नाहीत, ही मंडळीच त्याच्या सोबत जगभरचे अनुभव 'share' करायला येतात . 

 'Atmatrupti' बरोबरीनेच terrace top farming, इको-construction( Adobe building, Earth bag construction, rammed earth, bamboo constructions) , geo-dome, organic farming अशा विविध कार्यशाळा घेत तुषार भारतभर ( पुणे, नवी-मुंबई, बंगलोर, राजस्थान)  फिरत असतो.  

पूर्वी तो ह्या अनवट वाटेवर एकटाच होता, परंतु आता त्याला, त्याचे कार्य समजून घेणारी व  त्यात तितक्याच उत्साहात सहभागी होणारी साजेशी जोडीदार 'Aakanksha'  च्या रूपाने मिळाली आहे. 

1 comment:

  1. खूप छान शब्दांकन.👍
    तुषार बद्दल खूप डिटेल आणि उत्कंठातवर्धक माहिती दिली आहे..👍

    ReplyDelete