तर नावावरून सुज्ञ वाचकांना कळेलच असेल कि आज मी माळरानाची गोष्ट सांगणार आहे.
आमचे 'Canvas' हे असे केवळ दगड धोंड्यानी भरलेले असेल ह्याची खरेतर आम्हालाही कल्पना न्हवती.
माळरान पावसाळ्यात जरी हिरवे गार दिसले, तरी ती गवत आणि छोट्या रान वनस्पतींची करामात होती.
फार कमी आणि निकृष्टय दर्जाच्या मातीतही (top-soil) निसर्ग आपली किमया दाखवत असतो.
पण शेती करायची तर एक विशिष्ट दर्जाची माती लागते, अर्थात त्या साठी आधी माती असणेही गरजेचे असते.
आमच्या बाबतीत मात्र ' पृथ्वी दगड , तारे दगड ' आणि दगडंच दगंड चोहीकडे ह्याचा वारंवार प्रत्यय येत होता.
त्यात भरीस भर म्हणून त्या टेकडीचा उतार (slope) खूपच तीव्र होता. पण ह्या सगळ्यात दिलासा देणारी एक गोष्ट होती, ती म्हणजे आमची जमीन ही दोन भागांत विभागली होती आणि खालचा भाग एक छोटे भात -खाचर होते. (पण अगदीच काही नसण्या पेक्षा हे ही नसे थोडके )
टप्या टप्यात उतार विभागल्यामुळे झाडे लावणे ही सोप्पे जाणार होते आणि आमच्या डोळ्यापुढे वृक्षांनी वेढलेली पाय-वाट साकारत होती.
क्रमशः
You must be so proud to see green on the blank canvas now.
ReplyDeleteYes.. Happy and satisfied.
Delete