"You can't connect the dots looking forward; you can only connect them looking backward. So you have to trust that the dots will somehow connect in your future. You have to trust in something--your gut, destiny, life, karma, whatever. This approach has never let me down, and it has made all the difference in my life." --Steve Jobs
खरंय, आम्हाला तरी कुठे माहित होते, की आम्ही ज्या मार्गाने जात आहोत तो मार्ग आम्हाला ईप्सित स्थळी नेवून सोडेल, की आमचे वारू भरकटेल? पण पहिली अडखळती पाऊले टाकल्याशिवाय ते कळणार तरी कसे ?
आम्हाला आता ३ पातळ्यांवर काम बघावे लागत होते.
जमिनीचा barren land ते Multi Story agroforestry पर्यंतचा प्रवास, eco-tourism आणि गावी स्थलांतराचे पर्याय.गमतीचा भाग असा की ह्या तीनही पातळीवर आम्ही अजून बालवाडीतच होतो.
जमिनीचा barren land ते Multi Story agroforestry पर्यंतचा प्रवास, eco-tourism आणि गावी स्थलांतराचे पर्याय.गमतीचा भाग असा की ह्या तीनही पातळीवर आम्ही अजून बालवाडीतच होतो.
Multi Story agroforestry चे पहिले पाऊल म्हणून विंड ब्रेकींग साठी कदंब, बहावा,ऑस्ट्रेलियन साग, गुलमोहोर, त्या नंतर मुख्य जमिनीवर आंबा, फणस, जांभूळ इ. मोठी झाडे आणि सीताफळ, जांब, काजू, रामफळ, पेरू इ. मध्यम झाडे अशांची निवड आणि लागवड केली.
जमिनीचा एक भाग खूपच उताराचा होता, मग त्या पट्ट्यात अननसाची लागवड केली. अननस खायला मिळेल कि नाही ते माहित न्हवते पण, उताराच्या जमिनीवर मातीची धूप थांबविण्यासाठी तो एक उत्तम पर्याय होता.
मग ह्या वर उपाय म्हणून शहरातील घरालाच seedling लॅब बनवले. वेगवेगळ्या भाज्यांचे बी पेरून बघणे; मातीत, कमी मातीत (coir , व्हर्मी-कंपोस्ट आणि थोडी माती) आणि विना -मातीत (ओलसर कापूस) बियाणे लावून कुठले बी आधी अंकुरते आणि आजोळाला प्रत्यक्ष जमिनीत लावणे सोयीचे जाते ह्याचा अभ्यास सुरु झाला. जुन्या प्लास्टिक च्या बाटल्या, छोटे प्लास्टिक कप्स, प्लास्टिक कॅन्स, seedling trays ह्या मध्ये रोपे तयात करण्यात आली.शहरात घरी अंकुरलेली भोपळा, भेंडी, फ्लॉवर , कोबी , वांगी, टोमॅटो, तूर, मिरच्या इत्यादींची रोपे जेंव्हा आजोळच्या मातीत बहरू लागली तेंव्हा आनंदाला पारावार उरला नाही.
ह्या सर्वात मुलेही, मातीत खेळण्याचा, मोकळया आभाळाखाली विटांची चूल बनविण्याचा आणि त्या चुलीवर शिजवलेली साधीच डाळ-तांदळाची खिचडी, झाडाखाली बसून खाण्याचा आनंद अनुभवत होते.फक्त शहरात राहून आणि weekends ला मॉल्स भटकून किंवा movies बघून, अशा साध्या गोष्टीतही आनंद मिळतो हे त्यांना कसे कळले असते. मातीत खेळून हात खराब होत नाही तर मन प्रसन्न होते हे ही नसते अनुभवता आले.
क्रमशः
जमिनीचा एक भाग खूपच उताराचा होता, मग त्या पट्ट्यात अननसाची लागवड केली. अननस खायला मिळेल कि नाही ते माहित न्हवते पण, उताराच्या जमिनीवर मातीची धूप थांबविण्यासाठी तो एक उत्तम पर्याय होता.

आम्हाला वारंवार आजोळला जाणे शक्य न्हवते तसेच कित्यकेदा अतिशय कडक ऊन आणि बियांकडे झालेले दुर्लक्ष ह्या मुळे आम्ही आजोळला प्रत्यक्ष मातीत लावलेलं बी अंकुरत नसे किंवा रोपं फार छोटी असतानाच जळून जात. तिथेच कायम स्वरूपी राहून झाडांची काळजी घेणारे कोणी आम्हाला मिळत न्हवते. मिळाले तरी ३ महिन्यात पोबारा. ह्या २-३ वर्षात कातकरी, ठाकूर,नेपाळी अशा कोणा कोणाच्या हातापाया पडाव्या लागल्या, कोणा -कोणाच्या अगदी घरी जाऊन मनधरणी करावी लागली ह्याला ददात नाही. 'कोण म्हणतो बेकारी आहे !!'
मग ह्या वर उपाय म्हणून शहरातील घरालाच seedling लॅब बनवले. वेगवेगळ्या भाज्यांचे बी पेरून बघणे; मातीत, कमी मातीत (coir , व्हर्मी-कंपोस्ट आणि थोडी माती) आणि विना -मातीत (ओलसर कापूस) बियाणे लावून कुठले बी आधी अंकुरते आणि आजोळाला प्रत्यक्ष जमिनीत लावणे सोयीचे जाते ह्याचा अभ्यास सुरु झाला. जुन्या प्लास्टिक च्या बाटल्या, छोटे प्लास्टिक कप्स, प्लास्टिक कॅन्स, seedling trays ह्या मध्ये रोपे तयात करण्यात आली.शहरात घरी अंकुरलेली भोपळा, भेंडी, फ्लॉवर , कोबी , वांगी, टोमॅटो, तूर, मिरच्या इत्यादींची रोपे जेंव्हा आजोळच्या मातीत बहरू लागली तेंव्हा आनंदाला पारावार उरला नाही.

क्रमशः

SIR. VERY NOVEL AND USEFUL WORK YOU PEOPLE ARE DOING. WOULD LIKE TO MEET OR VISIT SOMETIME.
ReplyDeleteThank you Mukunji. You are most
ReplyDeletewelcome !!