मातीशी मैत्री करण्याबरोबरच, eco-tourism मध्ये जम बसविण्यास हळूहळू आम्ही सुरूवात केली. पण office सांभाळून वीकेंड्सना booking manage करणे, कायम स्वरूपी care taker च्या गैरहजेरीत rooms maintain ठेवणे, guests साठी भोजनाची सोय करणे आणि एकीकडे घराची आघाडी सांभाळणे हे सगळे stressful व्हायला लागले. हे म्हणजे असे झाले की ज्या धकाधकीच्या आयुष्यातून बाहेर पडण्यासाठी हे सगळे सुरु केले, ते आयुष्य आता पुन्हा नव्याने आणखीनच धकाधकीचे करून ठेवले.
दोघांपैकी एकाला पूर्णवेळ 'आजोळ'ची जबाबदारी स्वीकारणे आता भाग होते. मुलीची शाळा सोडून आणि इतर व्यवधाने सोडून कायम स्वरूपी आजोळला राहण्यासारखी परिस्थिती तेंव्हा न्हवती. आजही आजूबाजूच्या गावतील वातावरण वैचारिक दृष्ट्या मागासलेले आणि काही अत्यंत बेसिक सोयी सुविधांचा अभाव असणारे असेच आहे आणि 'आजोळ' घडविण्यामागे एक स्वयंपूर्ण, सृष्टीसौन्दर्याने नटलेले 'food forest' बनवणे हाच एक उद्देश आहे. गावात वैचारिक क्रांती घडवून आणणे किंवा गावाचा विकास करणे असे महान कार्य करण्यास आम्ही असमर्थ आहोत आणि त्याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे असा कुठलाही अभिनिवेश आम्ही बाळगत नाही. म्हणूनच गावी जाऊन राहणे आणि आहे त्या सामाजिक परिस्थित राहून बदल घडवून आणणे ही आमची सध्या तरी priority नाही. पण शहरीकरणामुळे जे एक धकाधकीचे आणि अनेक व्यवधाने असल्यामुळे थोडेसे complicated झालेले जीवन आपण जगतोय आणि आणि इतर असंख्य जीव जगत आहेत; ह्यातून चार घटका तरी बाहेर पडता यावे, 'TV', 'Internet' मुळे always connected असलेले आयुष्य थोडा वेळ 'disconnect' करता यावे आणि 'resort' ऐवजी गावातील साधेच परंतु आनंददायी जीवन, शुद्ध हवा, चविष्ट घरगुती भोजन आणि निसर्ग ह्यांच्या सहवासात माणसाला 'स्वतःशी connect' करता यावे. हा एकमेव उदयेश 'आजोळ' च्या eco -tourism मागे आहे.
तर असो, माणसाच्या काही मर्यादा असतात, तो एका वेळी काही मोजक्याच आघाडींवर पूर्ण लक्ष देऊ शकतो आणि त्या मर्यादा ज्याच्या त्याने ओळखून वागले तरच भ्रमनिरास होत नाही. त्या प्रमाणे काही व्यावहारिक कारणांमुळे मला 'आजोळ' ला राहून operations सांभाळणे शक्य नाही हे स्पष्ट होते आणि त्यालाही नोकरी सांभाळून ते करता आले नसते. मग करावे तरी काय? 'नोकरीला राजीनामा द्यावा का ?' 'इतक्या लवकर नोकरी सोडण्याचे पाऊल उचलावे का?' 'आजोळच्या संगोपनाच्या दिवसांतच कोणा care taker जोडप्यावर सोपवून देणे म्हणजे इतर अनेक व्यावसायिक 'रिसॉर्ट' प्रमाणेच झाले असते आणि शक्य होईल तेवढे 'commercialism' टाळण्याचे आम्ही प्रयत्न करीत होतो .'To be or not to be?' अशा प्रश्नांपर्यंत येऊन आता आमची गाडी रेंगाळली .
क्रमशः:
Waiting for next ...
ReplyDelete